कन्नड प्रतिनिधी दि. मराठा समाजाच्या नंतर आता बंजारा समाजाच्या एल्गार अनुसूचित जमाती ( एस टी )मध्ये समाविष्ठ करून आरक्षण देण्याची मागणीसाठी शुक्रवार १९ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय बंजारा आरक्षण समितीच्या वतीने तहसील कार्याल्यवर भव्य मोर्चा तहसीलदारा विद्याचरण कडवकर मार्फत शासनाला निवेदन देवून बंजारा समजला एस.टीत सामील करून एका महिन्यात अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणीसाठी शुक्रवारी १९ सप्टेंबर रोजी सकल बंजारा समाजाच्या भव्य मोर्चा चाळीसगांव रोड वरील गिरणी ग्राउंड येथून निघाला मोर्चात हजारोच्या संख्येने बंजारा समाजाचे पुरुष महिला सहभागी होते यात अनेक पुरुष महिलांनी

Featured Image

आपल्या पारंपारिक वेशभूषेत सहभाग नोदविला मोर्चातील लोकांच्या हातात जय सेवालाल सेवालाल महाराजाचे फोटो असलेले झेंडे होते आणि पुरुष महिला जय सेवालालच्या घोषणा देत होते मोर्चात मा.आ.उदयसिंग राजपूत बंजारा समाजाच्या बरोबर होते.अनेक राजकीय पक्षाच्या हिंदू मुस्लीम नेत्यांनी मोर्चाच्या मार्गावर चहा पाण्याची व नासत्याची व्यावस्था केली तहसील कार्यालय समोर भव्य मंच उभारण्यात आले होते.मोर्चात हजारोच्या संख्येने बंजारा समाजाचे लोक उपस्थित राहतील म्हणून कायदा व सुव्यावस्था अबाधित होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने दखल घेवून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला