भिलदरी  (ता. कन्नड) आज दि. २७ रोजी भिलदरी पिशोर व शफियाबाद परिसरात मुसळधार पावसाची सुरुवात झाली असून सततच्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.मका व आल्याचे पीक पूर्णपणे आडवे पडले असून हातात आलेले पीक पाण्याने वाहून जात आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. गावातील लहान–मोठ्या नाल्यांना पूर आला असून डोंगर भागात चरत असलेल्या जनावरांना बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा जीव धोक्यात घालून कसरत करावी लागत आहे. या

Featured Image

सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे पिके उध्वस्त झाली आहेत. याशिवाय रानडुक्करांच्या हल्ल्यामुळे मका पिकांचे अतिरिक्त नुकसान झाले आहे. शेतकरी राजाला आता बियाणे, खते यांचे पैसे फेडणे कठीण झाले असून सर्वत्र हताशा पसरलेली आहे.गावकऱ्यांनी सरकारकडे सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.