आगामी जि.प. पं. स.व नगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी जिंकणार : नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आ.सतीश चव्हाण कन्नड प्रतिनिधी दि. आमदार सतीश चव्हाण यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्या नंतर जिल्ह्यातील सर्वच तालुक्याच्या दौरा करीत आहे.सोमवारी २३ जून रोजी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आ.सतीश चव्हाण यांनी कन्नड तालुक्याचा दौरा केला शहरातील हिवरखेडा रोड वरील वाणी मंगल कार्यालयात राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचा वतीने नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आ. सतीश चव्हाण यांच्या जोरदार सत्कार करण्यात आला यावेळी तालुक्यातील अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हाजरी लावली यावेळी आ. सतीश चव्हाण यांनी उपस्थितांना

Featured Image

मार्गदर्शन करतांना सांगितले कि येणाऱ्या सर्व निवडणुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पूर्ण ताकतीने लढणार असुन मित्र पक्षाकडून सन्मानजनक वागणूक दिली तरच आगमी जि.प. पं.स.व नगरपालिका निवडणुकीत युती नाही तर स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी ठेवा असे आवहान कार्यकर्त्यांना केले राष्ट्रवादी कॉंग्रेस हि मूळ विचारा पासून दूर गेलेला नाही म्हणून महायुती कडून सन्मानजनक वागणूक मिळाली तरच युती नाही तर आम्ही युती तोडल्याला घाबरणार नाही असा इशारा महायुतीला नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आ.सतीश चव्हाण यांनी दिला आहे. चव्हाण यांनी पुढे सांगितले कि मा.आ.नितीन पाटील, आणि मा.नगराध्यक्ष संतोष कोल्हे एकत्र राहिल्यास जि.प.पं.स.व नगर पालिकेची निवडणूक जिंकणे अवघड नाही आ. सतीश चव्हाण म्हणाले कि मागील झालेल्या विधान सभेच्या निवडणुकीत अजित दादांनी कन्नडची जागेसाठी शेवट पर्यंत प्रयत्न केले होते यापुढे कन्नडची जागा ही राष्ट्रवादीच सोडून घेणार आणि निवणूक पण जिंकणार असा दावा हि चव्हाण यांनी केला आहे. यावेळी मा.आ.नितीन पाटील, संतोष कोल्हे,महिला जिल्हाध्यक्षा स्वाती कोल्हे, शहराध्यक्ष अहेमद अली भैय्या मेंबर,तालुका अध्यक्ष प्रकाश गाडेकर आदींनी आपले विचार व्यक्त केले. या प्रसंगी युवक जिल्हाध्यक्ष अनुराग शिंदे,युवक तालुका अध्यक्ष कल्याण पवार,कैलास अकोलकर, अॅड कृष्णा पाटील जाधव,संतोष निकम, युवराज बनकर, सुरेश डोळस,तात्याराव कदम,डॉ महेश काचोळे,पांडुरंग घुगे,उध्दव पवार,दीपक ताठे,सहित पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.